Frequenty Asked Questions

General

Registration

Payment

How to use Website & App ?

वेबसाईट व App रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर व Description Box मध्ये दिलेल्या वेळेवर Click करून तुम्ही हि माहिती Youtube Video वर हि पाहू शकता. 1. Registration options (01:02)

ह्या matrimony वर तुम्ही 2 प्रकारे रजिस्टर करू शकता- website अणि app.  जर तुमच्याकडे laptop / desktop असेल तर आम्ही तुम्हाला website वापरणे suggest करू. कारण website वर सगळे features उपलब्ध आहेत अणि स्थळांची माहिती पण मोठ्या screen वर व्यवस्थित दिसते. पण जर तुमच्याकडे laptop/ desktop  नसेल तर तुम्ही तुमच्या android  फोन वर app install  करू शकता.

त्यासाठी तुम्हाला अगोदर Description Box मध्ये दिलेल्या खालील लिंक वर click करून Google Play Store वरून App डाउनलोड करावे लागेल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.charmakarvivah.app

App अणि website दोन्ही माध्यमे userfriendly आहेत.

वेबसाईट व App रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर व Description Box मध्ये दिलेल्या वेळेवर Click करून तुम्ही हि माहिती Youtube Video वर हि पाहू शकता. 2. Sign up करायचे की sign in (02:12)

जर तुम्ही नवीन user असाल म्हणजेच पहिल्यांदा रजिस्टर करत असाल तर तुम्हाला signup वर click करायचे आहे. जर तुम्ही ह्या आधी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला signin वर click करायचे आहे.

वेबसाईट व App रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर व Description Box मध्ये दिलेल्या वेळेवर Click करून तुम्ही हि माहिती Youtube Video वर हि पाहू शकता. 3. Website registration (02:51)

प्रथम https://www.charmakarvivah.in ची website open करा. इकडे तुम्हाला sign up option दिसेल. तिकडे click करा. मग तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी काही fields दिसतील. त्या fields मध्ये तुमची माहिती enter करा. माहिती भरताना तुम्हाला तुमचा mobile number अणि email address enter विचारला जाईल. असाच mobile number द्या जो active असेल. अणि email address पण असा द्या ज्याचा तुम्हाला password लक्षात असेल. माहिती भरून झाल्या नंतर तुम्हाला तुमचा email address अणि फोन number verify करावा लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या mobile अणि email address वर otp येईल. Registration पुर्ण झाल्यावर तुम्हाला एक Profile ID दिला जाईल जो अशा format चा असेल eg. CV122456. Registration झाले, Verification झाले की तुम्हाला रजिस्ट्रेशन झालेबाबत SMS व इमेल येईल. परंतु फोटो अपलोड केल्या नंतरच तुमचा profile Active होतो (म्हणजे इतरांना तो दिसू लागतो). आता तुम्हाला sign in करावे लागेल. Sign in म्हणजेच login. Login करण्यासाठी तुम्हाला इमेल वर आलेल्या system generated Profile ID किवा तुमचा Registered email address आणि Registration करतेवेळी वापरलेला पासवर्ड टाकावा लागेल.

वेबसाईट व App रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर व Description Box मध्ये दिलेल्या वेळेवर Click करून तुम्ही हि माहिती Youtube Video वर हि पाहू शकता. 4. App registration (04:54)

App वर पण website सारखेच आहे. पहिल्यांदा रजिस्टर करत असाल तर signup करा नाहीतर signin. यामध्ये फरक एवढाच आहे कि, Registration  झाल्यावर OTP verify केला व फोटो अपलोड केला कि तुम्ही Automatic Login झालेला असाल व तुमचा profile active झालेला असेल. App वापराच्या आधी website वर रजिस्टर केले असेल तर direct signin करा. Signup नको. App व वेबसाईट वर तुम्ही स्वतः जो पर्यंत logout करत नाही तो पर्यंत तुम्ही logged in राहता. ज्या मुळे तुम्हाला दर वेळेस login ID अणि password टाकायची गरज नाही.

वेबसाईट व App रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर व Description Box मध्ये दिलेल्या वेळेवर Click करून तुम्ही हि माहिती Youtube Video वर हि पाहू शकता. 5. Profile photo upload (05:58)

Website असोत किवा app, Profile photo upload  करणे आवश्यक आहे. Profile Photo upload केल्याशिवाय process पुढे सरकत नाही. एकदा अपलोड केलेला फोटो नंतर बदलायचा असेल तर My Account पेज वरून Update Profile Image बटन वर click करून फोटो बदलू शकता.

एकदा तुम्ही login केलेत की my account वर click करा. तिकडे तुम्हाला edit preferences चे button दिसेल. त्यावर click करून तुम्ही तुमच्या अपेक्षा set करू शकता. तुम्ही ज्या अपेक्षा set कराल त्या नुसार तुम्हाला profiles सुचवले जातील. येवढेच नाही, तुम्ही इकडे ज्या अपेक्षा set कराल त्या नुसार तुम्हाला प्रत्येक profile चा match score कळेल. ज्या मुळे एखाद्या मुलीच्या किवा मुलाच्या अपेक्षा तुमच्या profile शि किती टक्के जुळत आहेत हे कळते. My Account पेज वरून तुम्ही हे करू शकता. या पेज वरून Edit Profile च्या बटन वर click करून तुम्ही तुमच्या प्रोफाईल च्या माहितीतहि बदल करू शकता. आता तुम्ही तुमचे छंद, आवडी / निवडी चा रकाना हि भरू शकता.

जर तुम्ही तुमचे identity proof upload केलेत उदा. आधार कार्ड तर तुमच्या profile वर genuine badge apply केला जाईल. ज्या मुळे जे वधू वर तुमचे profile बघतील त्यांना तुमचे profile genuine असल्याची खात्री होईल. जेणेकरून जास्तं वधू वर तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता वाढेल. My Account पेज वरून तुम्ही हे करू शकता.

तुम्ही तुमचे कुंडली details तुमच्या profile वर टाकू शकता. त्यासाठी 2 पर्याय आहेत. 1 तुम्ही कुंडलीचा photo upload करू शकता किवा तुम्ही टाकलेल्या जन्म तारीख, जन्म वेळ अणि जन्म ठिकाणाच्या आधारे website / app automatically तुमची कुंडली (Generate) तयार करून तुमच्या profile ला attach करेल. My Account पेज वरून तुम्ही हे करू शकता.

इकडे तुम्हाला तुमचे photo upload करायचे आहेत. ह्या आधी पण आपण photo upload बद्दल बोललो आहोत पण तो होता Profile/display photo. जेव्हा कोणी तुमचे profile बघेल तेव्हा त्याला पहिला दिसणारा photo म्हणजे Profile/display photo. पण Album gallery ही वेगळी गोष्ट आहे. Album gallery मध्ये तुम्ही तुमचे इतर additional photos टाकू शकता. तुम्ही जर album gallery मध्ये photo upload केले तरच तुम्हाला इतरांचे Profile/display photo बरोबरच इतर additional photo दिसतील. जर तुम्ही तुमची album galery empty ठेवलीत तर तुम्हाला इतरांचा फक्त display photo दिसेल पण त्यांच्या album gallery मधले additional photo दिसणार नाहीत. My Account पेज वरून तुम्ही हे करू शकता.

वेबसाईट वापरत असाल तर स्क्रीन च्या वरील बाजूस सर्च बटन आहे.  App वापरत असाल तर स्क्रीन च्या खाली उजव्या बाजूस बटन आहे.

Search वर click करून तुम्ही profiles search करू शकता. आपण आपल्या पार्टनर च्या अपेक्षा फॉर्म मध्ये नमूद करून Unlimited स्थळे पाहू शकता. ज्यात आपण, स्थळांचा संपर्क क्रमांक व संपूर्ण पत्ता व्यतिरिक्त संपूर्ण बायोडाटा, जन्म कुंडली व सर्व फोटो पाहू शकता. पेड मेंबर्स मोबाईल नंबर पाहू शकतात.

Search करण्याचे 5 प्रकार आहेत.  

पहिला आहे Basic Search. ह्यात तुम्ही एकदम basic points च्या आधारे profiles शोधू शकता उदा. फक्त वय आणि जात.

पुढचे आहे Regular Search. ह्यात तुम्ही मुलभूत, धार्मिक, प्रादेशिक, व्यावसायिक माहिती सोबतच फोटो, कुंडली, ऑनलाइन व पेड मेंबर्स असलेले profiles च्या आधारे search करू शकता.

पुढचे आहे Advanced Search. ह्यात तुम्हाला भरपूर parameters दिसतील ज्या basis वर तुम्ही profiles search करू शकता. उदा. यात regular search व्यतिरिक्त वैयक्तिक,  कौटुंबिक व वार्षिक उत्पन्न इत्यादी.

पुढचे आहे Keyword Search (हि सुविधा फक्त वेबसाईट वर आहे) ह्यात तुम्ही key word टाकून profiles शोधू शकता. उदा. doctor type केले की ज्या ज्या profiles मध्ये doctor शब्दाचा उल्लेख आहे ते सगळे profiles दिसतील. पुणे keyword टाकून search केले की पुण्यातले profiles दिसतील.

अणि शेवटचे आहे Search By Profile ID. यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रोफाईल चा ID टाकून तो प्रोफाईल पाहू शकता. उदा. CV122456

सर्च रिझल्ट्स मधून आवडीनुसार काही बाबी फिल्टर (स्क्रीनवरील डाव्या बाजूस असलेल्या) करून (अचूक शोध घेऊन) सर्च रिझल्ट्स कमी करू शकता. उदा. वय, उंची, शिक्षण, व्यवसाय इत्यादी. फिल्टर ची सुविधा फक्त वेबसाईट वर उपलब्ध आहे, app वर नाही.

या सेक्शन मध्ये तुम्ही शिक्षण, व्यवसाय, बिजवर, अपंग, व्यक्तिमत्त्व, छंद/इंटरेस्ट यावर आधारित तुमचा जोडीदार शोधू शकता. तुम्ही कोणताही सर्च केलात कि तुम्हाला एक ठराविक प्रोफाइल्स दिसतात. त्यामध्ये डॉक्टर किती, इंजिनियर किती, बिजवर किती या प्रत्येक category च्या स्थळांची संख्या automatic दिसून येईल. व त्या category वर click केल्यावर त्या category चीच स्थळे पाहता येतील. सर्च रिझल्ट्स चे वर उजव्या बाजूला अधिक चिन्ह आहे, त्यावर click केल्यावर हि group category ची स्थळे पाहता येतील.

वेबसाईट मध्ये My Account पेज वर डाव्या बाजूला Main Menu चे खाली Preference Matches यावर click केले असता Discover Matches या पेजवर तुम्ही Matching Score (टक्केवारीमध्ये %) सह प्रोफाइल्स पाहू शकता. App मध्ये My Account पेज वर Discover Matches या बटनवर click करून पाहू शकता.

या सेक्शन मध्ये Daily Matches, New Matches, Shortlisted Matches, Premium Matches, Yet to be viewed, Viewed but not contacted असे Matches पाहू शकता.

App मध्ये My Account पेज वर Discover Matches या बटनवर click करून पाहू शकता.

वेबसाईट मध्ये सर्वात वरती Matches व Daily Matches या बटन्स वर click करून पाहू शकता.

या सेक्शन मध्ये Featured, Popular व Recently Added Profiles पाहू शकता. 

App मध्ये स्क्रीन चे खाली Matches या बटनवर click करून पाहू शकता. 

वेबसाईट मध्ये My Account पेज वर मध्यभागी पाहू शकता.

या सेक्शन मध्ये तुमच्या Preferences नुसार, Preferred Location, Preferred Education, Preferred Profession, Compatible Stars, Family Values यांचे Matches पाहू शकता.

App मध्ये Home पेजवर Discover Matches चे खाली यांचे बटन्स आहेत. यावर click करून पाहू शकता.

वेबसाईट मध्ये My Account पेज वर उजव्या बाजूला मध्यभागी Discover Matches चे खाली यांचे नावापुढे अधिक चिन्हे आहेत. यावर click करून पाहू शकता.

स्क्रीन च्या उजव्या बाजूस खाली काळ्या/पांढऱ्या रंगातील एक गोल चिन्ह आहे.   त्यावर click करून तुम्ही ऑनलाईन असलेल्या मेम्बर्स बरोबर फ्री chatting करू शकता. किंवा ऑफलाईन मेंबर्स ना वैअक्तिक मेसेज हि पाठवू शकता. त्यानंतर कुणाकुणाचे व कायकाय ऑफलाईन मेसेजेस येऊन गेले हे तुम्ही My Accounts पेज वरील Chat History मध्ये पाहू शकता. हि सुविधा फक्त वेबसाईट वर उपलब्ध आहे, app वर नाही.

 

तुम्हाला जर एखादे profile आवडले तर ते तुम्ही shortlist करून ठेऊ शकता म्हणजे सारखं सारखं शोधत बसायला नको. वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे shortlist या बटन वर click केलत की हे सगळे निवडून काढलेले profiles तुम्हाला लगेच दिसतील. त्याचप्रमाणे प्रोफाइल्स ना Send Interest, Send Message पाठवू शकता. एखाद्या प्रोफाईल ला Ignore, Block, किंवा Customer support team ला Report करू शकता. एखादा प्रोफाईल आवडल्यास नातेवाईक, मित्रांना प्रोफाईल Share via E-mail किंवा Share via SMS करू शकता.

हा section खूप interesting आहे. इकडे तुम्हाला कोणी कोणी तुमचे profile बघितले. तुम्ही कोणाकोणाचे profiles बघितले. तुम्ही कोणाकोणाला interest/message/sms पाठवला आहे व कोणी कोणी तो स्वीकारला. कोणी कोणी तुम्हाला interest/message/sms पाठवला आहे. कुणी व किती जणांनी तुमचा mobile number बघितला. तुम्हाला कोणी शॉर्टलिस्ट केले, तुमची कुंडली कोणी पाहिली, तुमच्या माहितीची विनंती कोणी केली. अश्या सगळ्या profile related activities  तुम्हाला इकडे दिसतील. वेबसाईट वरील My Account page वरील डाव्या बाजूला असलेल्या Group Services किंवा स्क्रीन च्या वरील बाजूस असलेल्या MESSAGES व SERVICES बटन अंतर्गत पाहायला मिळतील.

Charmakarvivah matrimony च्या website अणि app वर रजिस्ट्रेशन करणार्‍या प्रत्येक profile ला OTP step complete करावीच लागते. आणि म्हणुनच fake profile बनण्याची शक्यताच नाही.